चंडीगड/एनजीएन नेटवर्क
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा यांचे लग्न राजस्थानमध्ये पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर लग्नाची तयारी देखील जोरदार सुरू आहे. एका रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न 25 सप्टेंबरला होणार आहे.
त्यापूर्वी संगीत आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे साखरपुड्याप्रमाणेच अत्यंत शाही पद्धतीने यांचे लग्न पार पडणार आहे. लग्नाची तयारी देखील सुरू आहे. नुकताच परिणीती चोप्रा हिने एक खास व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला होता. परिणीती चोप्रा हिने शेअर केलेला व्हिडीओ मालदीवमधील आहे. सुट्टयामध्ये धमाल करताना परिणीती चोप्रा ही दिसत आहे
.