बीड/एनजीएन नेटवर्क
माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठा निर्धार केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच, २०२४ इतिहास घडवणारे म्हणजेच बदलणारे वर्ष आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बीडमधील एक सभेत बोलत होत्या.
पंकज म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्यावर गळ्यात कोणतीही फुलाची माळ गळ्यात घालणार नाही, असे सांगितले होते. आता ओबीसी आरक्षण वाचले आणि लोकांनी गळ्यात हार घातले. आपण सर्वसमावेशक चेहरा असल्याने इतर पक्षांच्या ऑफर्स येत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.