सिन्नर/एनजीएन नेटवर्क
शिवशक्ती परिक्रमा दौऱ्यावर असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नांदूरशिंगोटे या ठिकाणी जाऊन आदिवासी वस्तीत भाकऱ्या थापल्याने तो अनेकांच्या कौतुक आणि चर्चेचा विषय बनला आहे. याशिवाय त्यांनी पिठले आणि भाकरी या जेवणाचा आस्वादही घेतला.
पंकजा मुंडे सध्या शिवशक्ती परिक्रमा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाला भेट दिली. तेथील एकलव्य आदिवासी वस्तीला भेट देवून पंकजा यांनी देवराम आगिवले यांच्या घरी चुलीजवळ बसून भाकरी थापून भाजल्या. भाकरी, पिठलं, कुळथाचे शेंगोळे, मटकीची उसळ, ठेचा तसेच शेंगदाण्याची पोळी अशा जेवणाचा आस्वाद पंकजा मुंडेंनी घेतला. पंकजा यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.