NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

सुंदर मुलींचे फोटो वापरून भारतीयांना अडकवण्याची ‘ना’पाक खेळी

0

लखनऊ/एनजीएन नेटवर्क

भारताविरुद्ध सातत्याने कुरघोड्या करणारा पाकिस्तान आता सायबर हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या गुप्तचर विभागाला मिळाली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या नव्या प्लॅनपासून सावध राहा, यावेळी त्यांच्या रडारवर भारतीय लष्कर, निमलष्करी दल, राज्य पोलीस अधिकारी आणि शास्त्रज्ञ आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना देण्यात आली आहे.

‘पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने फेसबुक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम, टेलिग्राम, लिंक्डइनवर अनेक बनावट प्रोफाइल बनवल्या असून 14 सुंदर मुलींचे फोटो वापरून भारतीयांना अडकवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सावध राहा, या हनीट्रॅपमध्ये अडकू नका’, असे आदेश देऊन गुप्तचर विभागाने सर्व बनावट प्रोफाइल्स जारी केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने सोशल मीडियावर सुंदर-सुंदर मुलींचे फोटो आणि भारतीय मोबाईल क्रमांक वापरून भारतीय मुलींच्या नावे प्रोफाइल्स तयार केल्या आहेत. यातील प्रत्येक प्रोफाइल अशी आहे की जी पाहताच कोणीही ती चालवणाऱ्याच्या प्रेमात पडेल. यांवर पोस्ट केले जाणारे फोटोही असे असतात की, ज्यांच्या पार्श्वभागावरून ते नेमके कुठे काढलेत याचा थांगपत्ता लागत नाही. शिवाय या प्रत्येक प्रोफाइलच्या फ्रेंड लिस्टमध्ये बहुतांशी लष्करातील लोक आणि पोलीस दिसतात.

गुप्तचर विभागाने 26 जून रोजी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात या सर्व प्रोफाइलच्या लिंक आणि त्या ज्या क्रमांकावरून बनवल्या आहेत ते मोबाईल क्रमांक नमूद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर यामध्ये पोलीस दलातील सर्वांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा या प्रोफाइल्सशी काहीही संबंध नाही, याची खात्री करून घेणासही सांगितले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.