NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

‘राष्ट्रवादी’ पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; पगार, ठाकरे, म्हैसधुणे समाविष्ट

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून नाशिक शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र पगार, नाशिक शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे,जिल्हा कार्याध्यक्षपदी विष्णूपंत म्हैसधुणे व गोरख बोडके यांची तर महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बाळासाहेब कर्डक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यालयात या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार शिवराम झोले, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, निवृत्ती अरिंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी रवींद्र पगार व शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे पुन्हा संधी देण्यात आली आहे. तसेच जिल्हा कार्याध्यक्षपदी विष्णूपंत म्हैसधुणे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर सिन्नर व देवळाली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडखे यांच्यावर त्र्यंबकेश्वर, इगतपूरी, दिंडोरी, पेठ व सुरगाणा तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बाळासाहेब कर्डक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.