NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

रुद्रा बहुउद्देशीय संस्थेचा ‘जागर मंगळागौरीचा’ कार्यक्रम उदंड उत्साहात !

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक प्रणित रुद्रा महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि वी स्क्वेअर एंटरटेनमेंट यांच्या वतीने शनिवारी आयोजित जागर मंगळागौरीचा कार्यक्रम उदंड उत्साहात पार पडला.  सुवर्ण लक्ष्मीनारायण लॉन्स निलगिरी बाग येथे पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल १९० महिला स्पर्धक सहभागी झाल्या.  

सदर कार्यक्रमात मंगळागौरी खेळांसोबतच पाककला, उखाणा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत सुमारे १९०  महिलांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीसे स्वरूपात   सोन्याची नथ तर ‘श्रावण सरी क्वीन’ला  पैठणी देण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना 21000/ रुपयांची बक्षीसे देण्यात आली.

या स्पर्धेत स्वामिनी मंगळागौर ग्रुप प्रथम विजेते ह्यांना 5001 रू. श्रावण क्वीन मंगळागौरी ग्रुप दुसरे विजेते ह्यांना 2100 रू तर तिसरे विजते साई समृद्धी मंगळागौर ग्रुप यांना 1100 रू व गौरी ग्रुप व साई हाइट्स ग्रुप ह्यांना 500 रू. चे असे धनादेश देण्यात आले. मंगळागौरी ग्रुपचे जयसिंग अश्विनी वैद्य मॅडम यांनी केले. उखाणा स्पर्धेचे पहिले विजेते रूपाली शेळके ह्यांना 2100 रू, दुसरे विजेते पूनम दाभाडे ह्यांना 1100 आणि तिसरे विजेते दर्शना जोशी 501रू. चे धनादेश देण्यात आले. उखाणा स्पर्धेचे परीक्षण कविता कुलकर्णी व ज्योती जॉर्ज यांनी केले. रांगोळी स्पर्धेचे पहिले विजेते संतोषी गंगारे ह्यांना 2100 रू, दुसरे विजेते मुग्धा गीते ह्यांना 1100 रू आणि तिसरे विजेते जागृती गायकवाड यांना 501 रू चे धनादेश देण्यात आले. रांगोळीचे परीक्षण हे सोशल मीडिया द्वारे झाले.

  पाककला स्पर्धाचे पहिले विजेता प्रमिला मंडळ ह्याना 2100 रू, दुसरे विजेते चैताली जोशी 1100 रू आणि तिसरे विजेते मीनल पावडे ह्यांना 501 चे धनादेश मिळाले. या कार्यक्रमात एक श्रावण क्वीन मनीषा फलक यांची निवड झाली. त्यांना क्राऊन, साशे, सोन्याची नथ देण्यात आले. श्रावण सरी ट्रीपची विनर सोनाली पवार यांना पैठणी देण्यात आली. श्रावण मंगळा ऍक्टिव्ह यांनाही पैठणी देण्यात आली. लकी ड्रॉ च्या विजेत्या प्रिया पाटील ठरल्या. त्यांना पैठणी भेट देण्यात आली. या कार्यक्रमास सुधा ठाकरे, पुनम सरोदे, मीराताई आवारे, सीमा गीते, प्रियंका पाटील, सविता भदाणे, हर्षल कुलकर्णी व पप्पू शिंदे यांनी सहकार्य केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वी स्क्वेअर एंटरटेनमेंटचे संचालक वरूणराज मोरे, इनर बिल क्लबच्या अध्यक्ष मनीषा तोंडे, माजी नगरसेविका सुजाता डेरे, मनसे शहराध्यक्ष अक्षरा घोडके, ज्योतीताई शिंदे, मीराताई आवारे, नाजनी ताराबाई, डॉ. श्वेता, डॉ. सुषमा भुतडा, राजू कटारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात माजी महापौर अशोक  मुर्तडक व मनसे लोकसभा निरीक्षक किशोर शिंदे तसेच श्री सातपुते यांनी याप्रसंगी सदिच्छा भेट देत आयोजक ज्योती जॉर्ज आणि कविता कुलकर्णी यांचे कौतुक केले. कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 4 मधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave A Reply

Your email address will not be published.