नाशिक/एनजीएन नेटवर्क
असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट कन्सल्टंट संस्थेतर्फे नुकतेचे कायदेविषयक ज्ञानसत्र हॉटेल एक्सप्रेस इन इथे आयोजित केले होते. सदर व्याख्यानाचा विषय प्रॉपर्टी आणि प्रिकॉशन असा होता. सदर व्याख्यान देण्यासाठी ॲड.जयंत जायभावे यांनी शेती,जागा,प्लॉट, बांधकाम ,याविषयी कायदेशीर दृष्ट्या आपले संरक्षण कसे करावे व आपण काय काळजी घेतली पाहिजे यावर माहिती दिली.
प्रॉपर्टी आणि प्रिकॉशन हा फार मोठा विषय असून सुद्धा त्यांनी अत्यंत सोप्या व उदाहरणासह हा विषय मांडला या कार्यक्रमासाठी 400 हून अधिक रिअल इस्टेट कन्सल्टंटसस् वकील ,डॉक्टर,इंजिनिअर, समस्त नाशिककर उपस्थित होते कार्यक्रमानंतर नाशिककरांनी प्रतिक्रिया देताना संस्थेने असे उपक्रम वर्षभर राबवण्यात यावे जेणेकरून सर्वसामान्य लोकांना कायदेविषयक क्लिष्टता अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत समजून घेता येईल.
सदर कार्यक्रम कार्यक्रमानंतर नॅशनल असोसिएशन ऑफ रियलटर्सर्इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाकुमार यांनी भरभरून कौतुक केले व संस्थेचे अभिनंदन केले आपल्या भाषणात शिवकुमार यांनी नाशिक शहराबद्दल कौतुक उदगार काढले व येणारा भविष्यकाळ नाशिकला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी मुंबई व पुणे येथून नार इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.
ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजक ब्रह्मा ग्रुप पुणे यांनी त्यांचे पुणे येथील विविध प्रकल्पांची माहिती सादर केली ब्रह्मा ग्रुप पुणे यांचे विविध प्रकल्प गुंतवणूक योग्य असल्याचे उपस्थित जाणकारांचे मत पडले .
संस्थेचे अध्यक्ष श्री.वसंत सोनवणे यांनी संस्थे विषयी माहिती देत सर्व रिअल इस्टेट क्षेत्रातील मंडळींना संस्थेचे सभासद होण्याकरीता आवाहन केले व संस्थेचे सभासद झाल्यावर होणारे फायदे याविषयी माहिती सादर केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे सेक्रेटरी जयंत गोवर्धने ,विवेक अग्निहोत्री , जयंत खांदवे,प्रशांत नहार ,सचिन मोरे, रशीद पिंजारी, बिपिन वाणी, सौरभ अग्निहोत्री ,प्रल्हाद सूर्यवंशी, निशा पवार, कृष्णमूर्ती मोरे, यांनी प्रयत्न केलेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत अग्निहोत्री यांनी केले.