नाशिक/एनजीएन नेटवर्क
जागृती फाउंडेशन, नाशिक यांच्यातर्फे कालिका माता मंदिर सभागृहात मातृतुल्य भगिनींसाठी आयोजित ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रमात दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या.
सदर कार्यक्रमात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई उत्कृष्ट वेशभूषा व व्हिडिओ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या अद्वैत नागरे,आरव देशपांडे, सबीर मराठे,श्रद्धा सूर्यवंशी, प्रिशा जगताप,अर्णवी साळुंके, लहान गटात शंभो पठाडे, रिधान बोरसे,रुद्रान्श देशमुख व उत्कृष्ट वेशभूषा म्हणुन हिंदवी सूर्यवंशी अशा दहा बालकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वटसावित्री निमित्त उत्कृष्ट सासु सून उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्येही सौ पूजा जाधव व सौ सरिता जाधव या दोन भगिनींना पैठणी देऊन गौरव करण्यात आला. मदर्स डे निमित्त ‘उत्कृष्ट आई’ या विषयावर सुंदर लिखाण करणाऱ्या नयना राजपूत यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आले.
याशिवाय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्ह्यातील 21 संस्थांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मयुरी शुक्ला ,शितल महाले, आणि प्राजक्ता देशपांडे,हेमलता वानखेडे यांनी जागृती फाऊंडेशन व होम मिनिस्टर या रांगोळीचे उत्कृष्ट सादरीकरण केले . हास्य पंचमी या टीव्ही नारळाचा घोळ हे हास्यकीट सादर करून आलेल्या सर्व प्रेक्षकांची लक्ष वेधून घेत सर्वांचे मन जिंकले त्याचबरोबर विजयमाला चव्हाण, रूपाली वालझाडे ,पूनम बर्वे, शितल महाले ,स्नेहा शिंपी, निशा चव्हाण ,रजनी शिंदे ,पूजा चव्हाण, प्रशांत पवार ,नीलिमा शेळके,सुनीता बाविस्कर, पुष्प लता ठाकूर,लता पाटील या सर्वांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम कुमावत यांनी केले व आभार प्रदर्शन सौ विजयमाला चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमाला चंदुकाका सराफ अँड सन्स, श्वेता कटारिया, मेघा वाघ, विजयमाला चौहाण, नीलम कुमावत ,भूषण कापडणे, ,तेजस्विनी ज्वेलर्स, अपोलो हॉस्पिटल, गांधी टीव्हीएस अँड ड्राईव्ह एक्स, शहनाई मेन्स डिझायनरअँड फोटो स्टुडिओ, साई कला पैठणी, इत्यादी मान्यवरांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. नाशिक ग्रामदेवता कालिका देवीला मानवंदना म्हणुन कु.अनया ठाकूर हीने नृत्य सादर केले व ६३ वर्षीय आई सौ सुरेखा मैंद यांनी माऊली माऊली या गाण्यावर उत्कृष्ट नृत्य सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाला नाशिक शहरातून 200 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदवला.
‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमात अस्मिता काळे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्याकडून सोन्याची नथ द्वितीय क्रमांक सौ सुरेखा मैंद यांना साई कला पैठणी यांच्याकडून पैठणी देण्यात आली. तृतीय क्रमांक साधना सालकर यांनी पटकावला त्यांना शहनाई मेन्स वेअर यांच्याकडून सूट सलवार देण्यात आले, कल्पना दूसिंग, पूजा बागुल प्रतिभा सूर्यवंशी यांना चंदुकाका सराफ आणि सन्स यांच्याकडून उखाणे स्पर्धा गेम्स यामध्ये उत्तेजनार्थ चांदीचे नाणे देण्यात आले.
सदर कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील सर्व महिलांनी ज्या पद्धतीने कार्यक्रमात सहभागी होऊन प्रतिसाद दिला त्याबद्दल जागृती फाऊंडेशनच्या संस्थापिका ललिता नवघिरे व संस्थापक प्रशांत शेळके यांनी सर्वांचे आभार मानले तसेच आपल्या मातृतुल्य भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद हा आमच्यासाठी काम करण्याची एक उत्कृष्ट प्रेरणा आहे अशा भावना व्यक्त केल्या.