नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिक शहराच्या बदलत्या जीवनशैलीशी सांगड घालणाऱ्या भाविक ग्रुपच्या ‘सेन्ट्रल पार्क’ या निवासी प्रकल्पातील अत्याधुनिक सुविधा गृह्स्वप्न बाळगलेल्या नाशिककरांना चांगल्याच भावत आहेत. या प्रकल्पासाठी जाहीर करण्यात आलेल्या अभिनव योजनेने त्या वास्तवावर शिक्कामोर्तब केले आहे. सदनिका (flat) बुक करून हमखास बक्षीस मिळवण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे चित्र दोन दिवसांत दिसले. दरम्यान, योजेनेचे दोन दिवस बाकी असून नाशिककरांनी तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रुपचे संचालक हेमल शहा यांनी केले आहे.
भाविक ग्रुपच्या द्रुतगतीने पूर्णत्वाकडे जात असलेल्या ‘सेन्ट्रल पार्क’ या निवासी ही ग्राहकाभिमुख योजना सदर करण्यात आली आहे. ‘सदनिका (flat) बुक करा आणि हमखास बक्षीस मिळवा’ असे योजनेचे स्वरूप आहे. गेल्या गुरुवारी (दि. २१) योजनेचा आरंभ झाला असून ती येत्या रविवार ( दि. २४) पर्यंत सुरु राहणार आहे. नाशिक शहराच्या उंटवाडी परिसरात सिटी सेंटर मॉलजवळ ‘सेन्ट्रल पार्क’ नवा प्रकल्प आकार हेत आहे. चार एकर परिसरात तब्बल २५ हून अधिक अत्याधुनिक सुविधा बहाल करणारा म्हणून या प्रकल्पाचे वेगळेपण अधोरेखित होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पामध्ये योगा झोन, त्रिस्तरीय सुरक्षा प्रणाली, किड्स प्ले एरिया, क्लब हाऊस, ग्रीन जीम, गणपती मंदीर, सिनिअर सिटीझन पार्क, पार्टी लॉन आदी २५ हून अधिक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
गेल्या दोन दिवसांत हजारो नाशिककरांनी प्रकल्पस्थळी भेट देवून माहिती घेतली. त्यापैकी अनेकांनी उपलब्ध सुविधा भावल्याने स्वप्नातील घर बुक केले. सदर योजना शनिवारी आणि रविवारी उपलब्ध असून नाशिककरांनी प्रकल्पास भेट द्यावी, असे आवाहन संचालक हेमल शहा यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी 9765113333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.