नाशिक/एनजीएन नेटवर्क
जागतिक संधिवात दिनानिमित्त, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे एक महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ प्रणित सोनावणे, संधिवात विकार तज्ज्ञ डॉ.राजवर्धन शेळके, आणि फिजिओथेरपिस्ट, डॉ. रोहन देव, यांनी आर्थरायटिसच्या महत्त्वाच्या समस्येवर उपस्थतीत जेष्ठ नागरिकांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल चे केंद्र प्रमुख डॉ. सौरभ नागर यांनी केले. आणि माहितीपूर्ण चर्चासत्राला सुरवात करण्यात आली. डॉ. सुशील पारख, मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु आणि बालरोग तज्ज्ञ, यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण केले आणि संधिवात बद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि बाधित लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले.नाशिक शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष , पदाधिकारी आणि सदस्यांच्या सहभागाने या कार्यक्रमाला भरीव प्रतिसाद मिळाला. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात सखोलता आणि नवं मूल्य जोडले गेले , संधिवात बद्दल लोकांना शिक्षित करण्याचे महत्त्व या चर्चासत्रांमुळे अधिक बळकट झाले. माहितीपूर्ण सत्रांव्यतिरिक्त, कार्यक्रमा अगोदर जेष्ठाची मोफत आरोग्य तपासणी उपक्रम हाती घेण्यात आला होता. ज्याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला.फिजिओथेरपिस्ट यांनी सांधेदुखीच्या रुग्णांना त्यांच्या सांध्याची हालचाल सुधारण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करण्यासाठी व्यायाम आणि तंत्रांचे फिजिओथेरपी प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली.
जागतिक संधिवात दिनाचे औचित्य साधून संधिवात आजार हा व्यक्ती आणि समुदायांवर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे महत्त्व यावेळी पटवून देण्यात आलं. एकत्रितपणे, सामूहिक प्रयत्नांद्वारे, आम्ही या दुर्बल स्थितीमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसाठी वेदनामुक्त भविष्य आणि चांगल्या दर्जाच्या जीवनशैलीसाठी प्रयत्न करू शकतो अशी भावना याप्रसंगी उपस्थित जेष्ठानी व्यक्त केली. आभार मार्केटिंग हेड पीयूष नांदेडकर यांनी व्यक्त केले आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले,