नाशिक/एनजीएन नेटवर्क
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, मविप्र चे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि. इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट, वुमेन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने फिजिओथेरपी दिनानिमित्त आयोजित मोफत अस्थिरोगनिदान, फिजिओथेरपी, हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिर रुग्णांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.
रेडक्रॉस फिजिओथेरपी सेंटरमध्ये झालेल्या या शिबिराचे उदघाटन मविप्र संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेडक्रॉस चेअरमन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी होते तर व्यासपीठावर सचिव डॉ. सुनील औंधकर, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत भुतडा, फिजिओथेरपी कॉलेज प्राचार्या डॉ. अम्रित कौर , कोषाध्यक्ष मेजर पी. एम. भगत, समन्वयक डॉ. प्रतिभा औंधकर , प्रतिभा भगत , वुमेन्स सेल च्या डॉ. दीप्ती वाधवा , डॉ. पक्षा कांबळे, क्रस्ना डायग्नॉस्टीक्स चे डॉ. ओजस्वी आघारकर, डॉ. सुरज मेंगाणे आदी मान्यवर उपस्थित होते . फिजिओथेरपी ही आता एक आव्हानात्मक शाखा म्हणून समाजमान्य होत असून अस्थिरोगतज्ज्ञांबरोबर कुशल फिजिओथेरपिस्ट्स हे खेळाडू, कामगार , ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच प्रवर्गाच्या वेदना सुसह्य करण्यात उपयुक्त ठरले आहेत”, असे प्रतिपादन ॲड. लांडगे यांनी याप्रसंगी केले.
यावेळी डॉ. भुतडा, डॉ. कौर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वाधवा , डॉ. कांबळे , डॉ. मेंगाणे आणि सहकाऱ्यांनी ५५ हुन अधिक रुग्णांची मोफत तपासणी केली . क्रस्ना डायग्नॉस्टिक्स च्या सौजन्याने हाडांचा ठिसूळपणा तपासणीदेखील विनामूल्य करण्यात आली. तसेच बॉडी मास कॉम्पोझिशन ॲनालिसिस करून सल्ला देण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वाधवा यांनी केले तर डॉ. प्रतिभा औंधकर यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वितेसाठी चंद्रकांत गोसावी , मंगल कस्तुरे , जयश्री कुलथे , मंगल रत्नाकर प्रयत्नशील होते .