मुंबई/एनजीएन नेटवर्क
हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. नाशिकसह सातारा, पुणे, पालघर, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, जळगाव आणि नंदुरबारमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारीही राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे.