- कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात रंगणार मैफल
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शुक्रवार ( दि. १९ ) रोजी होणाऱ्या ‘ओपन माईक कराओके’ मैफलीत शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट विजया माहेश्वरी ह्या गीत सादरीकरण करणार आहेत. माहेश्वरी यांच्या सर्जनशीलतेचे आज प्रथमच सादरीकरण होणार असल्याने त्यांच्या चाहते आणि हितचिंतक यांच्यात उत्कंठा निर्माण झाली आहे.
ही मैफल शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ऍडव्होकेट माहेश्वरी यांच्यासोबतच सुरेश कादी, ज्या शार्दुल, डॉ. सुनंदा मोरे, डॉ. ऋचा गुजर, स्फूर्ती कादी, कल्याणी होळकर, संजय पगारे, सुदाम सूर्यवंशी, संजीव खत्री, संजय पाटील. रुपेश पाचपुते, ऍडव्होकेट फारूक शेख, रामचंद्र भोजवानी, सी ए नंकुमार देशमुख, संजय भंडारी हेदेखील गीत सदर करणार आहेत. याप्रसंगी रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed.