NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नाशिकचा कांदा विक्रीसाठी जाणार तेलंगणात; कळवळा की राजकीय पेरणी ?

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

तेलंगणात सत्तेत असलेल्या भारत राष्ट्र समिती अर्थात ‘बीआरएस’ ने राजकीय पेरणीसोबत जिल्ह्यात शेतकऱ्यांना चीच्कार्ण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यानुषंगाने, कांदा खरेदीसाठी चाचपणी सुरू असून राज्य समन्वयक हर्षवर्धन जाधव यांनी बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात कांदा तेलंगणा राज्यात विक्रीसाठी नेण्याची घोषणा केली आहे. 

‘अब की बार, किसान सरकार’ चा नारा देत राज्यात शिरकाव करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बनलेला कांदा प्रश्न हाती घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात आपला पाया भक्कम करण्याच्या दृष्टीकोनातून पक्षाचे राज्य समन्वयक तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नाशिकच्या लासलगावातील उपबाजार असलेल्या विंचूर बाजार समितीत शेतकऱ्यांच्या भेटी घेत कांदा तेलंगणातील हैदराबाद बाजार समितीत पुढच्या आठवड्यापासून विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था करण्याची घोषणा केली. विंचूर बाजार समितीत झालेल्या कांदा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांच्या भेटीने बीआरएसने शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या कांदा प्रश्नावर हात घालत शेतकऱ्यांना दिलासा देत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी थेट विंचूर येथे उपबाजार समितीला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विंचूर येथील कांदा तेलंगणा राज्यातील हैदराबाद बाजार समितीत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था पुढील आठवड्यापासून केली जाणार असल्याचे जाहीर करत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला.

राजकीय पेरणीचा हेतू

महाराष्ट्रात पाय रोवू पाहणाऱ्या बीआरएस पक्षाने महाराष्ट्र कृषीबहुल असल्याची बाब हेरत शेतकऱ्यांना चुचकारणे सुरु केले आहे. इथले प्रस्थापित राजकीय पक्ष शेतकऱ्यांना न्याय देवू शकत नसल्याची बाब बिंबवून या मोठ्या घटकाला आपलेसे करण्याची खेळी यामधून खेळली जात असल्याचा निष्कर्ष काढण्यात येतो आहे. त्याच अनुषंगाने कांदा खरेदीतून राजकीय पेरणी करण्याचा हेतू लपून राहिलेला नाही.  

Leave A Reply

Your email address will not be published.