लासलगाव पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत
लासलगाव/विंचूर : राकेश बोरा/मच्छिंद्र साळुंके
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात आज सकाळच्या सत्रात कांद्याच्या लिलावावेळी संतप्त शेतकऱ्यांनी थेट नासिक छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर उतरून काही काळासाठी रस्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी लासलगाव पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तोडगा काढत विंचूर उपबाजार येथे कांद्याचे लिलाव हे पूर्ववत सुरू झाले आहे
उपबाजार विंचूर येथे सकाळच्या सत्रात सुमारे ३२५ वाहनातून कांदा विक्रीसाठी आला होता. सुरुवातीला गोल्टी आणि खादीच्या कांद्याचे लिलाव सुरू झाले. यावेळी निफाड तालुक्यातील गाजरवाडी येथील अण्णाजी हरीभाऊ आरोटे या शेतकऱ्याच्या गोल्टी खादीच्या कांद्याला २०० रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करण्यात आला; मात्र बीट रिव्हर्स करत हा भाव १०० रुपयांवर आणण्यात आला. त्यानंतर तो दर १५० रुपये प्रति क्विंटल निश्चित केल्याने शेतकऱ्यांचा एकच संताप उसळला आणि संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रस्ता रोको सुरू केला. परिस्थितीची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढली. अखेर शेतकऱ्यांना परत बाजार समितीच्या आवारात आणून पुनर्लिलाव करण्यात आला. यावेळी व्यापाऱ्यांच्या या कृती बद्दल बाजार समितीचे संचालक छबुराव जाधव चांगलेच संतप्त झाले तुला असा प्रकार घडल्यास संबंधित व्यापाऱ्याचे तात्काळ लायसन रद्द करण्यात येईल असा थेट इशारा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांसमोर दिला
दरम्यान, कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याचे चित्र आहे. मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्याने आणि केंद्र सरकारने खरेदी केलेला कांदाही आता बाजारात विक्रीसाठी उतरत असल्याने बाजारभाव दबावाखाली आले आहे त्यात शेतकरी दुकानदा आणत आहे त्याची प्रतवारी ही खालवली आणि मागणी नसल्यामुळे सातत्याने कांद्याचे बाजार भाव खाली येत असून शेतकऱ्याने आणलेला कांदा हा आत मध्ये खराब असल्यामुळे कांद्याला दिलेली बिट रिव्हर्स करण्यात आल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली
Comments are closed.