नवीन नाशिक/एनजीएन नेटवर्क
नवीन नाशिक परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास १० ते १२ दुचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, अचानक चौक, साईबाबा मंदिर मागची बाजू येथे हा प्रकार घडला. समाजकंटकांकडून दहशत पसरविण्याचा हा प्रकार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एका तरुणाचा निर्घृण खून झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली. भावाला का मारले या वादातून ही गाड्यांची तोडफोड झाल्याचे सांगितले जाते.