येवला/एनजीएन नेटवर्क
तालुक्यातील देवळाणे येथे भ्रमणध्वनी दुकानातून भ्रमणध्वनींसह रोख रक्कम असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य दोन जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, येवला तालुक्यातील देवळाणे येथे सुनील खोकले यांचे भ्रमणध्वनी दुकान असून त्यांच्या दुकानात संशयित संजय शिंदे , आकाश गायकवाड आणि करण हे तिघे खोकले यांच्या घराजवळ चारचाकी वाहनाने आले. खोकले यांना चाकूचा धाक दाखवत दोन्ही दुकानांमधील भ्रमणध्वनी तसेच रोख रक्कम असा एक कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयितांचा पाठलाग करीत संजय शिंदे यास ताब्यात घेतले. अन्य दोन संशयित फरार असून या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.