युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार शिवसेना तथा युवासेना सचिव आमदार वरूण सरदेसाई यांच्या मुख्य उपस्थितीत उद्या बुधवारी ( दि. १३ ) रोजी दुपारी ४.०० वा. युवासेना उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शासकीय विश्राम गृह, गोल्फ क्लब, नाशिक येथे होणार आहे.
या बैठकीसाठी नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे व नंदूरबार या पाच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार वरूण सरदेसाई मार्गदर्शन करणार आहेत. यासह लोकसभानिहाय बैठका घेऊन विधानसभानिहाय आढावा घेणार आहेत. सर्व युवासेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी केले आहे.
Comments are closed.