पाटणा/एनजीएन नेटवर्क
नियत फिरलेल्या डॉक्टर आणि कम्पाऊंडरने नर्सिंग होममध्ये कार्यरत नर्सवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोघे नराधम एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी नर्सची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर नर्सचा मृतदेह घटना स्थळापासून 80 किमी दूर नेण्यात आला. पण पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीमुळे या घटनेचा छडा लागला आहे. बिहारमधील मोतिहारी येथे सामूहिक बलात्कार आणि त्यानंतर हत्येची भीषण घटना समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण एका खासगी नर्सिंग होममध्ये घडले आहे.
खासगी नर्सिंग होममध्ये डॉक्टर आणि कंपाउंडरने नर्सवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप आहे. ही घटना फेनहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी सेवा सदन या नर्सिंग होममधून समोर आली. येथे काम करणारी एक परिचारिका दोन दिवसांपासून बेपत्ता होती. नर्सिंग होमलाही दोन दिवस टाळे ठोकण्यात आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
एफआयआरमध्ये मृताच्या आईने नर्सिंग होमच्या ऑपरेटरसह अनेकांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नर्सिंग होम सील करून कंपाउंडरला अटक केल्याची माहिती मृत परिचारिकेच्या आईने दिली आहे.