NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

पवारांच्या गटात असे राहिले आमदार आणि खासदारांचे संख्याबळ…

0

मुंबई/एनजीएन नेटवर्क

अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून आज (बुधवार, ५ जुलै) मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केले गेले. अजित पवार गटाला जवळपास ४०-४१ आमदारांचा तर शरद पवार गटाला एकूण १३ आमदारांचा पाठिंबा असल्याचे आज सिद्ध झाले.

मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर सभागृहात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण १३ विधानसभा आमदार, ३ विधानपरिषद आमदार आणि ५ खासदार उपस्थित आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्याकडेच विधानसभेच्या आमदारांचे संख्याबळ अधिक असल्याचे दिसले.

Leave A Reply

Your email address will not be published.