मुंबई/एनजीएन नेटवर्क
राज्यातील अनधिकृत शाळांची संख्या पाहता याबाबत कोणते रॅकेट आहे की, काय असा प्रश्न पडतो त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. राज्यात शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये 1300 पैकी 800 शाळा या कागदपत्रातील तृटींमुळे अनधिकृत ठरल्याची बाब निदर्शनास आल्याबाबत तारांकीत प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. याला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी 661 खाजगी शाळा या अनधिकृत आढळल्याचे सांगितले. या अनधिकृत शाळांवर कारवाई, दंड आणि फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिल्याचेही केसरकर यांनी सांगितले.
आशिष शेलार यांनी शाळांच्या परवानग्यांमध्ये दिसून येणारी ही दिरंगाई पाहता यामध्ये कोणते रॅकेट काम करतेय का असा प्रश्न पडतो त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त करुन चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी उच्चस्थरिय चौकशी करण्याचे मान्य केले.