NGN News
Latest Marathi News

नाशिक जि. प. महिला अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात ! ठेकेदाराकडून..

  • वैशाली ठाकरे आणि कर्मचारी अरुण धारणकर जेरबंद

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि कर्मचारी अरुण धारणकर यांना ५० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (अेसीबी ) अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, ठाकरे यांनी संबंधित ठेकेदाराकडे एका कामाच्या बदल्यात ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याप्रकरणी ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने शहानिशा करून घेत बुधवारी (दि.१८) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सापळा रचला. ठेकेदार लाचेची रक्कम घेऊन कार्यालयात आला. ठाकरे यांना ठेकेदाराकडून पैसे स्वीकारताना पथकाने पकडले. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या कार्यशैली बद्दल यापूर्वीही ठेकेदारांमध्ये कमालीचा आक्षेप होता. कामाच्या निमित्ताने भेटायला येणाऱ्या ठेकेदारांशी उद्धटपणे वागणे आणि अर्वाच्य भाषेचा वापर करणे, अशा तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. या कारवाईमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Comments are closed.