NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

ना टायर्ड, ना रिटायर्ड हूँ, मै तो फायर हूँ.. नाशकात शरद पवारांची फटकेबाजी

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

अजित पवार तुम्हाला रिटायर्ड व्हायला सांगत आहेत त्यावर काय सांगाल, अशी पृच्छा केली असता ‘ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ, मै तो फायर हुं’ या अटलबिहारी वाजपेयींच्या ओळी उधृत करीत उत्तर शरद पवार यांनी येथे उत्तर दिले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ यांना आम्हीच येवल्याची जागा लढवायला देऊन सुरक्षित केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचे वय ८४ होते. ते ज्या जोमाने काम करायचे तो अनुभव थक्क करणारा होता. वय होते यात काही वाद नाही. पण तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर वय साथ देते. त्यामुळे तो काही प्रश्न नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे.

.. म्हणून भुजबळांना येवला दिले..

छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर आमची इच्छा होती की त्यांनी विधानसभेत आवश्यकता आहे. त्यानंतर येवल्यातून त्यांनी निवडणूक लढवली. १९८६ मध्ये मी काँग्रेसमधून बाहेर पडलो वेगळा पक्ष निवडला होता तेव्हा नाशिक जिल्ह्याने आम्हाला विजयी केले होते. जनार्दन पाटील हे येवल्यातून दोनदा निवडून आले होते. मारोतराव पवारही निवडूनही आले होते. त्यामुळेच आम्ही भुजबळांना सेफ जागा दिली होती. त्यावेळी तशी चर्चा झाली आणि तो निर्णय घेतला होता असंही आज शरद पवार यांनी सांगितले.

नाशिकमधून सुरुवात करण्याला महत्व

स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिकचे वेगळे महत्व आहे. काँग्रेसच्या इतिहासातही नाशिकचे वेगळे महत्त्व आहे. अनेक उत्तम मार्गदर्शक या शहराने दिले आहेत. आणखी एक गोष्ट अशी आहे की आम्ही सगळे जण जी पिढी राजकारणात पडली त्यांचा आदर्श यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळी चीनचं संकट देशावर आलं आणि त्यांना नेहरुंनी दिल्लीत बोलवलं. त्यांना संरक्षण मंत्री केलं. चव्हाण यांचा पहिला लोकसभेतला प्रवेश नाशिकमधून झाला. ही नाशिकची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी इथून सुरुवात केली आहे असेही शरद पवार यांनी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.