नाशिक/एनजीएन नेटवर्क
चार दिवसांपूर्वी दुगारवाडी धबधब्यात तरुण वाहून गेल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी दुगारवाडीसह हरिहर किल्ल्यावर वीकेण्डला जाण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वीकेण्डला हरिहरगड तसेच दुगारवाडी धबधबा या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी तीन वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. हौशी पर्यटकांच्या हुल्लडबाजीला वेसन घालताना मद्यपान करण्यासह ते सोबत बाळगणे, वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याशिवाय, धोकादायक ठिकाणी फोटोसेशन, सेल्फीला मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्र्यंबकेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी दिला आहे.