संगमनेर/एनजीएन नेटवर्क
राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आमदार रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर टीका करण्यापूर्वी थोडा इतिहास समजून घ्या, त्यांना इतिहास ठाऊक नाही. एवढेच नाही तर राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची चिंता करु नका, खातेवाटप लवकरच होईल असेही भुजबळ यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही एक महिन्याने खाते वाटप झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली.
भुजबळ म्हणाले, रोहित पवारला सांगा, मी जानेवारी, फेब्रुवारी १९८५ मध्ये आमदार झालो. एप्रिल १९८५ ला मुंबईचा मुंबईचा महापौर झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठे केले, मोठे केले असल्या फालतू गोष्टी करु नका. इतिहास जाणून घ्या. छगन भुजबळ एक सामान्य कार्यकर्ता म्हणून शरद पवारांकडे आला नव्हता. मी शिवसेनेचा नेता होतो आणि आमदार होतो. आज किती दिवस हे चालले आहे. अजित पवार तुम्हाला भेटत आहेत. अजित पवार आणि तुमचे पवार घराणे ठरवून शरद पवारांचा राजीनामा द्यायचा हे करता. तेव्हा आम्हाला सांगितले होते का? जास्त मी त्याला किंमत देत नाही. ते जेवढं पुढे येतील तेवढा मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देईन, असे म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.