NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

दारु, गुटखा, तंबाखू ,प्लास्टिक बंदी; नैताळे ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

0

** एनजीएन नेटवर्क

नैताळे/संजय साठे

“गाव करी, ते राव काय करी” या म्हणीचा प्रत्यय नुकताच नैताळेकराना आला आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अतिशय सवेंदनशिल गाव म्हणून नैताळे गावाची चर्चा होत असते.येथील तरुण दिवसेन दिवस दारु,गुटखा,तंबाखू यामुळे व्यसनाधिन होत असल्याने या संदर्भात अनेकांनी वरिष्ठाकडे अर्ज -फाटे करुन बघितले मात्र  फारसा फायदा झाला नसल्याने आज शेवटी नैताळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत महिलांनी व पुरुषानी गावात दारु,गुटखा,तंबाखु तात्काळ बंद करावा असा ठराव बहुमताने मंजुर केला आहे.

महाराष्ट्र शाशनाच्या नियमानुसार व सुचनेप्रमाने आज नैताळे ग्रामपंचायत व्यावस्थापनाने ग्रामपंचायतीच्या सभागृहात सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन केले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच निशा पाठक ह्या उपस्थित होत्या.तर व्यासपिठावर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थित  ग्रामस्थाना शाशकिय अधिकाऱ्यांनी विविध योजना संदर्भात माहिती दिली.ग्रामविकास अधिकारी कल्पेश बरु यांनी केंद्र सरकारच्या मेरा मिट्टी मेरा देश या अभियाना बाबत माहिती दिली.तसेच महाराष्ट्र ग्रामीन रोजगार हमी योजना संदर्भात अतिम आराखडा तयार करण्यासाठी विविध कामांची निवड करण्यात आली.ग्रामपंचायतीचा थकीत कर कोणत्याही  परिस्थितीत वसुल करावा अन्यथा समंधीत ग्रामस्थांचा पाणी पुरवठा तात्काळ बद करावा असाही एकमुखी निर्णय  घेण्यात आला.तसेच गावातील घनकचरा ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काच्या जागेतच विल्हेवाट लावावी असे ठरविण्यात आले. गावातील असंख्य तरुण- पुरुष व्यसनाधिन झाल्याने गावात दारुबंदी झालीच  पाहीजे असा विषय सभेत अनेकांनी मांडल्याने त्यावर दादा बोरगुडे ,राजेद्र बोरगुडे,लक्ष्मण भवर,यांनी आपले विचार मांडले.व गावात कोणत्याही परिस्थितीत दारु बंदी,गुटखा बंदी व तंबाखू बंदी व प्लास्टिक बंदी  झालीच पाहिजे असा बहुमताने निर्णय घेऊन त्या बाबतचा ठराव बहुमताने मंजुर करण्यात आला.

—————

@ गाव आणि परिसरात दिवसेन दिवस घनकचरा वाढताना दिसतो आहेत त्यात सर्वात जास्त प्लास्टिक चा समावेश असल्याने आज पासुन ग्रामसभेच्या बहुमताच्या ठरावा नुसार ४० मायक्राँन जाडीच्या आत आसलेल्या प्लास्टिकला बंदी करण्यात आली आहे.
कल्पेश बरु, ग्रामविकास अधिकारी  नैताळे ग्रामपंचायत 
Leave A Reply

Your email address will not be published.