NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नितीन गडकरी यांनी घेतला ट्रक चालकांच्या हिताचा ‘हा’ मोठा निर्णय

0

नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

आता देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. . केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ही मोठी घोषणा केली आहे. गडकरींनी हा नियम लागू करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन उद्योगाला या नियमानुसार बदल करण्यासाठी १८ महिन्यांचा वेळ आवश्यक आहे. रस्ते, वाहतूक मंत्रालयाने पहिल्यांदा २०१६ मध्ये याबाबतचा प्रस्ताव आणला होता. गडकरी म्हणाले, आपल्या देशात काही चालक १२ ते १४ तास गाडी चालवतात. इतर देशांमध्ये बस आणि ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. आपल्या देशात चालक ४३ ते ४७ अंश सेल्सियस तापमानात गाडी चालवतात. यावरून आपण आपल्याकडील चालकांच्या परिस्थितीचा अंदाज लावू शकतो.  गडकरी यांच्या या निर्णयानंतर भर उन्हात उष्णतेचा मारा सहन करत १२ ते १४ तास ट्रक चालवणाऱ्या ट्रक चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयावर मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. गाडी चालवण्याची कठीण परिस्थिती आणि रस्त्यांची अवस्था यामुळे तासंतास ट्रक चालवणारे चालक थकून जातात. याच कारणाने अनेक अपघातही होतात. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.