NGN News
Latest Marathi News

मराठा आंदोलनासाठी निफाडमधून रसद; ४८ गावांतून ४५ हजार भाकरी रवाना

लासलगाव : राकेश बोरा
मराठा आंदोलनाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी निफाड तालुक्यातील ४८ गावांमधून तब्बल ४५ हजार भाकऱ्यांची शिदोरी तयार करण्यात आली आहे. लासलगाव येथील विविध महिला संघटना व गावोगावच्या महिलांनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभाग घेतला.

मराठा आंदोलनासाठी भाकरीचा समाजातील महिलांनी मोठा हातभार लावत २० महिलांच्या गटांनी दिवसरात्र कष्ट करून २,५०० पेक्षा अधिक भाकऱ्या तयार केल्या. या भाकऱ्या आंदोलनस्थळी पोहोचवण्यासाठी ८ गाड्यांतून शिदोरी पाठवण्यात आली. भाकरी बनवण्यासाठी लागणारे ३०० किलो पीठ व २०० किलो बाजरीचे पीठ स्थानिक बाजार समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यात सर्व जातीधर्मातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत समाजातील ऐक्याची भावना अधोरेखित केली.

या उपक्रमामुळे मराठा आंदोलनाला ग्रामस्थांचा प्रत्यक्ष पाठींबा लाभत असून, गावागावांतून आंदोलनासाठी दिला जाणारा हा सहकार्याचा हात एकता व बांधिलकीचे प्रतीक ठरत आहे

Comments are closed.