- २,५०० खेळाडूंमधून बहुमान प्राप्त; नवी दिल्ली येथे विशेष प्रशिक्षण सुरू
लासलगाव : राकेश बोरा
निफाड तालुक्यातील खानगाव नजीक येथील हर्षवर्धन संदीप गारे याची अंडर-14 राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे लासलगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
हर्षवर्धन हा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संदीप गारे यांचा मुलगा असून इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत आहे. तो लासलगाव स्विमिंग ग्रुपचा सक्रिय सदस्य आहे. महाराष्ट्र ॲकॅडमीच्या वतीने नवी दिल्ली येथे झालेल्या विभागीय निवड प्रक्रियेत २५०० खेळाडूंमधून १८ जणांच्या अंतिम संघात त्याची निवड करण्यात आली.
सध्या हर्षवर्धनचे नवी दिल्ली येथे विशेष प्रशिक्षण सुरू असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. तो “आत्मा मालिक गुरुकुल, कोकमठाण” या शाळेचा विद्यार्थी असून, त्याला प्रशिक्षक शर्मा व हिंगोले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हर्षवर्धनच्या या यशाबद्दल मान्यवरांनी अभिनंदन केले
Comments are closed.