नाशिक : नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सह पतसंस्था आणि महाराष्ट्र राज्य गिरीजा महिला मंच संयुक्त विद्यमाने जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमा अंतर्गत कष्टकरी नऊ महिलांचा ज्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास केला अशा महिला शकुंतला नवदुर्गा गिरजा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करत असताना स्वतःच्या विकासाकडे लक्ष द्यावे या हेतूने असे विविध उपक्रम राबविले जातात.
या उपक्रमात साठी खास मविप्र संस्थेचे प्राचार्य डॉ. सोपान कुशारे, महिला सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती आमने, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार , डॉ सुरेखा कुलकर्णी ,प्रतिभा म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात नवदुर्गांचा सन्मान करून बचत गटाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांच्या उपस्थितीत ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर डॉसुरेखा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. तर बचत गटाची कार्यपद्धती या विषया महिलांना प्रशिक्षण देण्यात आले . कै. शकुंतला राजाराम गवळी यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात आला ..
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ.सोपान कुशारे यांनी भूषवले त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करून महिलांना अधिक शैक्षणिक दृष्ट्या सक्षम कसे करता येतील या संदर्भात मार्गदर्शन केले उत्तम नगर नवीन नाशिक भागात कष्टकरी समाज जास्त प्रमाणात राहतो आणि या महिलांसाठी रात्रीचे शाळा कॉलेज शिक्षण कसे उपलब्ध करून दिले जातील याबाबतही मार्गदर्शन केल. त्याचबरोबर माननीय ज्योतीताई म्हणाल्यात महाराष्ट्रभर नोकरीच्या माध्यमातून खूप ठिकाणी फिरले पण बचत गटाच्या माध्यमातून इतक्या गुणात्मक दृष्टीने उभे राहणार काम हे पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यात झालेले दिसते आहे याबद्दल संस्थेचे संचालक, अध्यक्ष बोरस्ते यांचे कौतुक केलेत. Dr Ashwini Ashok Boraste म्हणाल्यात संस्था स्थापन केली आज 1000 ची संख्या ओलांडली आहे स्री शक्ती एकवटली तर एक चांगला समूह उभा राहतो हे या संस्थेच्या माध्यमातून सिद्ध होत आहे आर्थिक विकासाबरोबर मानसिक विकास वैयक्तिक विकास सामाजिक विकास यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून महिलांना समृद्ध संपन्न केले पाहिजे साठी महिलांसाठी प्रशिक्षण व नवदुर्गा सन्मान हा कार्यक्रम आयोजित केलेला होता.