सातपूर/एनजीएन नेटवर्क
नाशिकमधील सातपूर आणि अंबड परिसरात खाजगी विकासाकांनी विकसित केलेल्या प्लॉटवरील उद्योजकांना रस्ते,पथदीप मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत विकासाकांकडून होत असलेली टाळाटाळ आणि दिरंगाईबाबत निमाने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत आवाज बुलंद केल्यानंतर विकासकांनी ते काम सुरू केले. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला.
त्यामुळे उद्योजकांना मोठा मिळाला असून लवकर हे काम पूर्ण करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. निमात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीत बैठकीत सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या,जबाबदारी टाळू नका असा इशारा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आणि कार्यकारी अभियंता जयंत बोरसे यांनी खासगी विकासकांना उद्योजकांसमोरच दूरध्वनीवरून दिला होता. त्यानंतर त्याची फलनिष्पत्ती लगेचच दिसून आली.
सातपूर आणि अंबड परिसरात खाजगी विकासकांनी विकसित केलेल्या भूखंडांबाबत अनेक तक्रारी प्लॉटधारकांकडून निमाकडे आल्यानंतर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी त्याची तातडीने दखल घेऊन या प्लॉटधारकांना न्याय मिळवून देण्यास आठ दिवसांपूर्वी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित केली होती.यावेळी त्या भूखंडांवरील उद्योजकांनी तक्रारींचा पाढाच वाचला होता. खाजगी विकासकांनी विकसित केलेल्या प्लॉटवर रस्ते बनवून देण्याची जबाबदारी खाजगी विकासाची असतानाही त्यांनी ते तयारच करून दिलेले नाहीत. ठीकठिकाणी खड्डे आणि प्रचंड प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहेत.पथदीपांचा पत्ता नाही आदी तक्रारी या सर्वांनी मांडल्या होत्या.उद्योजकांच्या व्यथा ऐकल्यानंतर एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयंत बोरसे उद्योजकांसमोर विकासकांना फोन लावून मूलभूत सुविधांचे काम तातडीने सुरू करा.व कालबद्ध कार्यक्रम आखून 31 ऑगस्टपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून द्या,असे निर्देश दिले होते आणि त्यानुसार हे काम तातडीने सुरू झाले आहे.यामुळे उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत.
कामाच्या शुभारंभ प्रसंगी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बूब,निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, एमआयडीसीचे उप अभियंता एम जी पवार,विकासक भूपेंद्र शहा, कंत्राटदार बी.जी.भावसार,उद्योजक अविनाश बोडके,किरण शेळके,बाबूशेठ नागरगोजे,सुजित भोर,कुंदन डरंगे,हेमंत खोंड, राजेंद्र वडनेरे आदी उपस्थित होते.