ओमकार पवार यांनी पदभार स्वीकारला
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ओमकार पवार यांनी आज पदभार स्वीकारला. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या हस्ते त्यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. श्री.ओमकार पवार हे यापूर्वी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभागाचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.
दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री. पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य व केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, लोकाभिमुख प्रशासन म्हणून पुढील काळात जिल्हा परिषदेच्या वतीने काम करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
Comments are closed.