मुंबई/एनजीएन नेटवर्क
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर राज्यभर एकच खळबळ उडाली होती. या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली असून तो व्हिडिओ सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेकडून मिळाली आहे.
याबाबत आता महत्वाची बातमी समोर आली आहे. व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाकडून या व्हिडीओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचं आढळलं आहे. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत.