नाशिकरोड/एनजीएन नेटवर्क
दातृत्वाचा ज्ञानयज्ञ या उपक्रमात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सेवानिवृत्त प्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक यांनी दिलेल्या गुप्त दानाच्या माध्यमातून आणि माजी विद्यार्थी आनंदा मुठाळ, प्रेसमधील सेवानिवृत्त अधिकारी कैलास सूर्यवंशी,ज्येष्ठ साहित्यिक आणि संवेदनशील विचारवंत तु. सी. ढिकले यांनी दिलेल्या सत्पात्री दानातून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले. स्वातंत्र्यदिनी नवा गणवेश परिधान करून हे विद्यार्थी ज्यावेळेस विद्यालयात आले; त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शतगुणीत झाल्याचे बघायला मिळाले आणि कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले.
तसेच पालक शिक्षक संघाचे सदस्य आणि माजी विद्यार्थी दयाराम गायधनी यांनी विद्यालयाच्या मदतीसाठी रक्कम रु.5,000/-,नाशिकरोड येथील सुप्रसिद्ध नक्षत्र हॉटेलचे संचालक आणि माजी विद्यार्थी सतीश शिवाजी कासार यांनी सहा चार्जेबल ट्यूब देत या दातृत्वाच्या ज्ञानयज्ञात सत्पात्री सहकार्य केले.
या सर्व दानशुरांसह आजपर्यंत आजी-माजी विद्यार्थी,पालक आणि समाजातील विविध घटकांनी जे जे अनमोल सहकार्य केलं;त्या सर्वांचे मनापासून आभार! ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रांतील दानशूर यांनी दिलेले शैक्षणिक साहित्य पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रदान मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
नासाकाचे अवसायक बबनराव गोडसे,नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे,मुख्याध्यापक सुनील बर्वे,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व दानशुरांचे आभार मानले.