मुंबई/एनजीएन नेटवर्क
२०२४ मध्ये होऊ घातलेल्या राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल काय असेल याबद्दल एका सर्व्हेक्षणाचे निकाल समोर आले आहेत. ‘न्यूज एरिना इंडिया’ या संस्थेने केलेल्या या सर्व्हेत महाराष्ट्रात भाजपला तब्बल सव्वाशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या सर्व्हेतून विधानसभा निवडणूकीबद्दल अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत सध्याच्या घडीला भाजपा 123-129 तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 25 जागा मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतर पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 55-56, काँग्रेस 50-53 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 17-19 आणि इतर 12 जागा मिळवतील असे सांगण्यात आले आहे. यासर्व्हेमध्ये भाजप महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला होत असून माविआशिवाय त्यांना 28 जागाही जिंकता येणार नाहीत, असे या सर्व्हेतून दिसून आलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये किरकोळ वाढ होईल पण बहुमताच्या जवळ जाणार नाहीत कारण उद्धव ठाकरे कोकणाबाहेर मजबूत नाहीत, असेही सर्व्हेत म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेने पेक्षा मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. तसेच भाजप आणि इतर अधिकअपक्ष मिळून 140 संख्याच्या आसपास असेल म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याचे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. राज्यात मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला देणार असा प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. त्यानंतर लोकांनी देवेंद्र फडणीसच यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले आह. या सर्व्हेनुसार देवेंद्र फडणवीस (35%), अशोक चव्हाण (21%), अजित पवार (14%), एकनाथ शिंदे (12%), उद्धव ठाकरे (9%), इतर (9%) अशी मते मिळाली आहेत.
कुणाला किती जागा?
भाजप- 123 ते 129
शिवसेना- 25
राष्ट्रवादी- 55 ते 56
काँग्रेस- 50 ते 53
ठाकरे गट- 17 ते 19
अपक्ष- 12
कोकण विभाग
भाजप- 29 ते 33
शिवसेना- 11
ठाकरे गट- 14 ते 16
काँग्रेस- 5 ते 6
राष्ट्रवादी- 7-8
अपक्ष- 5
मुंबई विभाग (एकूण जागा 36)
भाजप- 16 ते 18
शिवसेना- 2
ठाकरे गट- 9 ते 10
काँग्रेस- 5 ते 6
राष्ट्रवादी- 1
अपक्ष- 1
पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा 58)
भाजप 22 ते 23
शिवसेना- 1
राष्ट्रवादी- 23
काँग्रेस- 9 ते 10
ठाकरे गट- 1
अपक्ष- 1
मराठवाडा (एकूण जागा 46)
भाजप 19
शिवसेना 5
राष्ट्रवादी 9
काँग्रेस 10
ठाकरे गट 2
अपक्ष 1
उत्तर महाराष्ट्र/ खान्देश (एकूण जागा 47)
भाजप 23
शिवसेना 3
राष्ट्रवादी 14
काँग्रेस 6
ठाकरे गट 0
अपक्ष 1
विदर्भ ( एकूण जागा 62)
भाजप 30 ते 31
शिवसेना 5
राष्ट्रवादी 2
काँग्रेस 20 ते 21
ठाकरे 0
अपक्ष 4