नाशिक/एनजीएन नेटवर्क
आपल्या पुर्वसुरींच्या, महान स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने मिळालेले हे स्वातंत्र्य हौतात्म्याने, हालअपेष्टांनी आणि त्यांच्या महान कष्टाने प्राप्त झालेले आहे आपल्या नवीन पिढीला यांची जाणीव असणे गरजेचे आहे. सेवानिवृत्तीनंतर समाजासाठी काम करुन अशी जाणीव जागृती करण्याचे कार्य मी येथुन पुढे करणार आहे आपण सर्वांनी या प्रयत्नांना साथ द्यावी असे आवाहन माजी शिक्षण संचालक नितीन उपासनी यांनी केले.
भारताच्या ७६व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या प्रांगणात नितीन उपासनी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. अविनाश भिडे, कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, कार्यवाह सुभाष सबनीस, कोषाध्यक्ष अनिल देशपांडे, गंगाधर कुलकर्णी, प्रवीण कुलकर्णी,सचिन पाडेकर, सुहास भणगे, ॲड.समीर जोशी, महेश शुक्ल,मीनाक्षी वैद्य, अनिल नांदुर्डीकर सुहासिनी बुरकुले,अजित कुलकर्णी,सतीष करजगीकर, मानसी देशमुख आणि संस्थेचे अनेक मान्यवर उपस्थित होते.