मुंबई/एनजीएन नेटवर्क
टाटा समूहाचा कारभार पुढील पिढीकडे देण्याची वेळ आली आहे. त्यादृष्टीने पाऊलं पण टाकण्यात येत आहे. माया टाटा ही या नवीन पिढीचा चेहरा आहे. यामध्ये इतर पण वारस आहे. पण माया टाटा विषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. माया टाटा प्रसिद्धीपासून दूर असते. ती सोशल मीडियापासून दूर आहे. टाटा समूहातील जबाबदारीचे पद तिच्याकडे आहे. ती रतन टाटा यांची पुतणी आहे.
रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि टाटा समूहाचे पूर्व चेअरमन सायरस मिस्त्री यांची बहिण आलू मिस्त्री यांच्या घरी मायाचा जन्म झाला होता. माया ही नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोना टाटा यांची नात आहे. मायाची आजी सिमोना टाटा यांनी लॅक्मे अँड ट्रेंट्सची स्थापना करण्यात मोठी भूमिका निभावली होती. त्यांनी जागतिक पातळीवर हा ब्रँड नावारुपाला आणला होता. माया टाटा यांचे शिक्षण इंग्लंडमधील बेयस बिझनेस स्कूल आणि वारविक विश्वविद्यालयात झाले आहे. त्यांनी टाटा कॅपिटलची सहायक कंपनी टाटा अपॉर्च्युनिटीज फंडमध्ये महत्वाच्या पदी जबाबदारी घेतली. त्यांनी टाटा समूहात एंट्री घेतली. माया टाटाने पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि गुंतवणुकीसंबंधी व्यवसायात तिचे कौशल्य दाखवले आहे. त्यामुळे कॉर्पोरेट जगतातील आव्हाने आणि ती सोडविण्याचे कसब तिने आत्मसात केले. रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली माया टाटा यांची वाटचाल सुरु आहे. माया टाटा यांना टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या मंडळात माया, तिची बहिण लिआ आणि भाऊ नेविल यांच्यासोबत समावेश करण्यात आला आहे.