नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार लाँच केली. टोयोटा इनोव्हाचे फ्लेक्स फ्लूअल मॉडेल त्यांनी आज सादर केले आहे. आता देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच शंभरी टक्के इथेनॉलवर कार धावेल. पर्यावरणासाठीही ही कार फायदेशीर ठरेल.
इथेनॉलची खास म्हणजे, हे इंधन शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या ऊसापासून हे बनवले जाते. या कारचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, ती इथेनॉलसह हायब्रिड प्रणालीवर ४० टक्के वीज निर्मिती करेल, त्याचाही प्रवासासाठी वापर करता येईल. ही कार जगातील पहिली BS6 फेज-२ इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स-इंधन कार असल्याचा दावा करण्यात आला आहे.