त्र्यंबकेश्वर/एनजीएन नेटवर्क
नाशिक जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी डॉ. जलज शर्मा हे आपला कार्यभार स्विकारण्याल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथे आले आणि भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाले.
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, स्वप्निल शेलार, मनोज थेटे यांनी त्र्यंबकेश्वर कोठी हाऊसमध्ये स्वागत करुन सत्कार केला. यावेळी भगवान त्र्यंबक राजाच्या रत्नजडीत मुकुटाचे दर्शन घडवुन मुकुटाची माहिती कैलास घुले यांनी करुन दिली. जिल्हाधिकारी डॉ. जलज शर्मा यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी डॉ. श्रिया देवचके मुख्याधिकारी तथा प्रशासक देवस्थानचे सचिव म्हणून जिल्हाधिका-यांचे स्वागत केले. यावेळी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती उपस्थित होत्या.
त्र्यंबकेश्वराचे प्रदोषपुष्प पुजक वेदमुर्ती उल्हास आराधी यांनी नुतन जिल्हाधिकारी व नवनियुक्त विश्वस्त यांना तिलक करुन शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तत्पुर्वी सोमवार निमित्त भगवान त्र्यंबकराजाचा पालखी सोहळा पारंपारीक पध्दतीने संपन्न झाला. नवनियुक्त विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, स्वप्निल शेलार, मनोज थेटे या पालखी सोहळ्यास उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना सिंहस्थ कुंभमेळा तयारीबाबत विचारणा केली तसेच मंदिराबाबतची माहिती घेण्यात आली. त्यानंतर सोमवार पालखीचे दर्शन घेऊन रत्न जडीत मुकुटाचे दर्शन घेतले. यावेळी नवनियुक्त विश्वस्त श्री कैलास घुले, स्वप्नील शेलार, पुरुषोत्तम कडलग, मनोज थेटे आदी उपस्थित होते.