NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नीरज चोप्राचा ‘सुवर्ण’वेध..वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील ऐतिहासिक नोंद !

0

 नवी दिल्ली/एनजीएन नेटवर्क

भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण कामगिरी केली आहे. नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. नीरजने पहिला थ्रो फाऊल केला होता, पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने ८८.१७ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. संपूर्ण सामन्यात कोणत्याही खेळाडूला यापेक्षा पुढे भालाफेक करता आली नाही.

हंगेरीमध्ये झालेल्या पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (२७ ऑगस्ट) झाला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले. तिसरा थ्रो त्याचा सर्वोत्तन थ्रो ठरला. नदीमने 87.82 मीटर भाला फेकला. तर झेक रिपब्लिकच्या जाकुब वडलेचने 86.67 मीटर भाला फेकला. नीरजशिवाय भारताच्या डीपी मनू आणि किशोर जेना यांनीही भालाफेकच्या अंतिम फेरीत पदकासाठी झुंज दिली. पण किशोर पाचव्या आणि मनू सहाव्या स्थानावर राहिला.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रॅक आणि फील्ड प्रकारात भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे. या प्रकारात गोल्ड मेडल जिंकणारा नीरज पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये लांब उडीत कांस्यपदक पटकावले होते. नीरज पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी देखील पात्र झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान खेळवले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.