मुंबई/एनजीएन नेटवर्क
विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर नीलम गोऱ्हे कायम राहणार आहेत. कायद्यानुसार त्यांना अपात्र ठरवता येणार नसल्याचा निर्णय तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी दिलाय. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यानं त्यांना पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र 10 व्या शेड्युलनुसार उपसभापतींवर अशी कारवाई करता येणार नाही. तसंच अजूनही त्या शिवसेना पक्षातच असल्याचं डावखरे यांनी म्हटले आहे. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले म्हणून विरोधकांनी त्यांना पदावरून हटविण्याची तसेच त्यांना अपात्र करण्याची मागणी विधान परिषदेत केली होती
पण 10 व्या शेड्यूलनुसार उपसभापती यांच्यावर अशी कारवाई करता येणार नाही. तसेच त्या निवडून आलेला पक्ष शिवसेना असून त्या अजूनही शिवसेना पक्षातच असल्याचे तालिका सभापतींनी सांगितलं. पक्षातरांच्या बाबतीत घेतलल्या आक्षेपात सभापती किंवा उपसभापती यांनी पक्षांतर केलं तर ते अपात्र ठरणार नाही. या पदाला तशी सूट ही कायदयात देण्यात आलेली आहे असंही डावखरे यांनी स्पष्ट केलं. निलम गोऱ्हे यांनी 14 मे 2020 पासून ज्या पक्षाला पाठिंबा दिला आहे तो पक्ष बदलला नाही. चिन्ह आणि नाव हे त्याच पक्षाचे आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निलम गोऱ्हे कायम राहतील. त्यांनी पक्षांतर केलं अशी तरतूद किंवा नियम आढळून येत नाही. म्हणून उपसभापती म्हणून गोऱ्हे यांचे संविधानिक तरतूदीनुसार अधिकार अबाधीत राहतील असंही निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं.