नाशिक/एनजीएन नेटवर्क
नाशिकच्या औद्योगिक वसाहती बरोबरच नागरी वसाहती समस्या मुक्त करण्यासाठी महानगरपालिका एमआयडीसी उद्योजक व पोलीस अशी सर्व समावेशक प्रतिनिधींची समन्वय समितीची निर्मिती करावी, असे आवाहन नाशिक च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले.
निमाच्या वतीने आयोजित औद्योगिक वसाहतीतील समस्या, वाहतुक,अतिक्रमणे,माथाडी कामगार संघटना कडून होत असलेला उद्योजकांचा छळ,महिला कामगारांची सुरक्षा, कामगारांची बनावट लिस्टद्वारे कामगार संघटना तर्फे होणारात्रास ,औद्योगिक वसाहती कायदा सुव्यवस्था संबंधित आदी विषयावर चर्चा करण्यासाठी निमा हाऊस येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे , आयामाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, गोविंद झा, निमा उपाध्यक्ष आशिष नहार,के एस बी चे उपाध्यक्ष मोहन पाटील, राजेंद्र वडनेरे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख,सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव,अंबड चे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे आदी उपस्थित होते.
मोनिका राऊत यांनी उद्योजकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देऊन त्या वर विशेष लक्ष घालून लवकरात कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले, त्याच प्रमाणे वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सायबर सेल अत्याधुनिक सोयी सुविधा नी कार्यरत आहे त्या मुळे सायबर गून्ह्याची तक्रार विना विलंब करावी असे त्या म्हणाल्या.
यावेळी निमाचे अध्यक्ष बेळे यांनी नाशिकच्या औद्योगिक वसाहतील विविध समस्या मांडल्या,उद्योजकांचा जास्त वेळ कारखान्याच्या कामात लक्ष पुरवण्या ऐवजी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात जातो , गुंडगिरी,बनावट कामगारांच्या याद्या बनउन उद्योजकांना धमकावणे, छोटया मोठया गुंडागर्दी च्या घटना,गर्दीच्या तासा मधील वाहतुकीचे नियत्रंण, सिग्नल व्यवस्थेत बदल व दोष विरहित करणे , कामगार युनियन चे वाद, वर्गणी मागणी साठी प्रतिबंध, ब्लॅक मेलिंग तसेच नियोजन करून होणाऱ्या चोऱ्या या विविध विषयावर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांचे लक्ष वेधले.
आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी अंबड औद्योगिक वसाहती सह शहरातील मुख्य रस्त्यांच्या वाहतुक व अतिक्रमणे या समस्यांवर उपाय योजना करण्याची मागणी केली, याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे संजय सोनवणे यांनीही काही सूचना केल्या,निपम चे सरचिटणीस हेमंत राख यांनी एच आर व आयर च्या बाबतीमध्ये आपले सूचना मांडल्या,मोहन पाटील यांनी नाशिक शहर पुणे मुंबई नंतर विकासाच्या दिशेने गरुड झेप घेत आहे त्या मुळे या शहरातील समस्या वेळीस सोडल्या गेल्या तर औद्योगिक विकासाला चालना मिळेल आज जगभरातील नवोदित उद्योगासह प्रस्तापित उद्योजकांच्या नजरा नाशिक कडे लागून आहेत असे ते म्हणाले. योगिता आहेर यांनी महिलांच्या बाबतीमधील वेगवेगळ्या समस्या मांडल्या, अडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांनी येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय यावर आपले मत मांडले, याबरोबरच इतरही उद्योजकांनी आपल्या समस्या मांडल्या सर्व उद्याजकांच्या प्रश्नांना पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व पोलीस सह आयुक्त शेखर देशमुख यांनी समर्पक उत्तरे दिली.
सूत्र संचालन राजेंद्र अहिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आशिष नहार यांनी मानले. कार्यक्रमास मनीष रावल, हेमंत खोंड, विराज गडकरी, निपमचे सरचिटणीस हेमंत राख, आयमाचे माजी अध्यक्ष ज्योतिराव वाघ, प्रकाश गुंजाळ, सुहास डोईफोडे ,विजय जोशी ,गोविंद बोरसे ,लोकेश पीचया ,तुशित बनकर,श्रीकांत पाटील, वाईनरी असोसिएशनचे श्री राजेश जाधव, राजेश बोरसे, महाराष्ट्र चेंबरचे नाशिक शाखा अध्यक्ष संजय सोनवणे,प्रशांत कासलीवाल , मिथीलेश वैद्य, नितीन वडगावकर,गोरख पगार चेतन पाटील आदिसह 50 ते 60 उद्योजक व उद्योग प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.