NGN News
Latest Marathi News

निफाड डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉ. ऋषिकेश, डॉ. सारिका दौंड यांना धन्वंतरी पुरस्कार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

निफाड : निफाड तालुका डॉक्टर्स असोसिएशनतर्फे दरवर्षी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर दिल्या जाणाऱ्या धन्वंतरी पुरस्काराने यंदा दंतरोगतज्ज्ञ डॉ. ऋषिकेश दौंड आणि डॉ. सारिका दौंड यांना सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. ऋषिकेश दौंड यांचे आई-वडील व परिवारातील सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. वटघुले, डॉ. घुगे, डॉ. नाठे, डॉ. वैष्णव आणि डॉ. मुक्ततेश दौंड यांनी मनोगत व्यक्त करून पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले. निफाड तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. उत्तमराव डेर्ले यांनी असोसिएशनची स्थापना, आजवर झालेली वाटचाल, बदल आणि संघटनेची उद्दिष्टे याविषयी माहिती दिली. दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्रासमोर निर्माण होणाऱ्या समस्या, विविध संकटे तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधील संघर्ष यावर प्रकाश टाकत, अशा परिस्थितीत असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टरांना कशाप्रकारे मदत व मार्गदर्शन करता येऊ शकते, याबाबत त्यांनी विवेचन केले.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. ऋषिकेश दौंड व डॉ. सारिका दौंड यांनी असोसिएशनचे आभार मानले. कार्यक्रमास डॉ. किरण राठी, डॉ. दिलीप तासकर, डॉ. हाडपे, डॉ. सुनील कापसे, डॉ. अरुण कातकडे, डॉ. योगेश क्षिरसागर, डॉ. वैष्णव, डॉ. भूषण राठी, डॉ. कविता धारराव, डॉ. सविता ताथेड, डॉ. रोहित धोक्रत, डॉ. पान गव्हाणे, डॉ. नाब्रिया आणि डॉ. रूपेश वाघ यांच्यासह असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सविता ताथेड यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. अरुण कातकडे यांनी केले.

Comments are closed.