- संजय धनगर ‘एसीबी’ जाळ्यात
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडे तब्बल 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या नायब तहसीलदारास अडीच लाख रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. संजय धनगर असे लाचखोर अधिकार्याचे नाव असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जमिनीचा अनुकूल निकाल लावून देण्याच्या बदल्यात धनगर यांनी तक्रारदाराकडे 10 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर, तडजोडीत अडीच लाखांमध्ये हे प्रकरण निकाली काढायचे ठरले. त्यानुसार, शहरातील सोपान हॉस्पिटलसमोर लाच स्वीकारत असताना एबीसीने थेट धाड टाकत धनगर यांना अटक केली. याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments are closed.