NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा

0

नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , निमा न्यू नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी पूजन, तसेच राष्ट्रीय आयुर्वेद दिवस ,अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे उत्साहात साजरा करण्यात आला.

धन्वंतरी पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या शुभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशोका समूहाचे चेअरमन अशोक कटारिया, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख , हृदयरोग तज्ञ डॉ सुधीर शेतकर ,सेंटर हेड डॉ सौरभ नागर , मार्केटिंग हेड पीयूष नांदेडकर , निमा न्यू नाशिकचे अध्यक्ष डॉ. दीपक चौधरी, सचिव डॉ प्रशांत वाणी , कोषध्यक्ष डॉ परीक्षित खाचणे व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

निमा न्यू नाशिक तर्फे यंदाचा मानाचा धन्वंतरी पुरस्कार डॉ. अनिल जाधव यांना देण्यात आला .दिडशे पेक्षा जास्त सभासदांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अजय पाटील व डॉ. अविनाश बाविस्कर व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे विपणन अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.