- लिलावात ३० लाखाच्या बोलीवर समावेश
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी, अक्षर पटेल-के एल राहुलच्या दिल्ली कॅपिटल-डी सी तर्फे निवड झाली आहे. आयपीएल लिलावात, ३० लाख या रकमेच्या बेस प्राइस -कमीतकमी बोली किंमत वर दिल्ली कॅपिटलने साहिल पारखला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले आहे. बेन डकेट , डेव्हिड मिलर ,करुण नायर , कुलदीप यादव , मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी सारखे नामवंत खेळाडू डी सी मध्ये असुन केविन पिटरसन या संघाचा प्रमुख मार्गदर्शक – मेंटर – आहे. अबू धाबी येथे २४० भारतीय खेळाडुंसह १४ सहयोगी देशातील मिळून एकुण ३५० क्रिकेटपटूंवर आय पी एल लिलावात बोली लागली.
साहिलने नुकतेच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत वरिष्ठ महाराष्ट्र संघात पदार्पण केले. १९ वर्षांखालील वयोगटासाठीच्या विनू मंकड स्पर्धेत साहिल महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. नाशिकचा खेळाडू भारतीय संघात असावा हे सर्व नाशिककरांचे स्वप्न साहिल पारख साकार करत सप्टेंबर २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारखने १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतांना ,आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत, भारतीय संघाला जोरदार विजय मिळवून दिला होता.
साहिलच्या या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व सर्व पदाधिकारी आणि संबंधितांनी त्याचे अभिनंदन करून भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments are closed.