- जयपूर येथील वार्षिक सभेमध्ये अध्यक्षांकडून घोषणा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल अर्थात ‘नरेडको’ च्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नाशिकमधील सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक तथा शिल्पा इस्टेटसचे संचालक जयेश ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे. जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेमध्ये ‘नरेडको’ महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रशांत शर्मा यांनी ठक्कर यांच्या निवडीची घोषणा केली.
या बैठकीला महाराष्ट्रभरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरेडको महाराष्ट्राचे नूतन अध्यक्ष कमलेश ठाकूर यांच्या कार्यकाळात वरील नूतन पदाधिकारी व मुबईस्थित बांधकाम व्यवसायिक नवीन ऊर्जेने कामकाज पार पाडणार आहेत. पुणे येथील राजेंद्र पाटे आणि नागपूर येथील घनश्याम ढोकणे यांचीही ‘नरेडको’ महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय पंकज कोठारी (अकोला), अरविंद खबाळे (कराड) आणि दिनेश दोशी (रायगड) यांची संयुक्त सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली. नवीन नियुक्त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
@ नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रश्न महाराष्ट्र स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण आपल्या कार्यकाळात कटिबद्ध राहू. तसेच नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला नव्या जोमाने चालना देण्यासाठी कार्य करणार आहोत.
- जयेश ठक्कर, नूतन उपाध्यक्ष, नरेडको
Comments are closed.