- वातावरण ढवळून निघणार; पोलीस प्रशासनाची कसरत
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यातील महायुती शासनाकडून जनतेची होणारी हेळसांड लक्षात घेता लक्ष वेधण्यासाठी नाशिकमध्ये बुधवार ( दि. १० ) पासून तीन दिवस विविध प्रश्नांसाठी मोर्चे निघणार आहेत. या मोर्चांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघणार आहे.
बुधवारी पहिला मोर्चा निघणार असून माकप, भाकप, आम आदमी पार्टी या प्रगतीशील पक्षांतर्फे त्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील खड्डे, अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा याविरोधात आवाज उठवण्यासाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते महापालिका असा हा मोर्चा निघणार आहे. दुसरा मोर्चा गुरुवारी मनसे आणि शिवसेना उबाठा गटाच्या वतीने निघणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा त्याचा मार्ग असेल. शहरातील तिसरा मोर्चा शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निघणार असून स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत पवार त्यामध्ये सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांना भेसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा असेल.
या तीनही मोर्चाना होणारी गर्दी लक्षात घेता शहरात वाहतूककोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी शहरात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची चांगलीच कसरत होणार आहे.
Comments are closed.