NGN News
Latest Marathi News
Keral Tour
sidebarimage
sidebarimage

नाशकात दोन दिवसीय राज्यस्तरीय ‘इमॅजिकाँन’ परिषद; ५०० तज्ञांची उपस्थिती

0

नाशिक/एनजीएन नेटवर्क

नाशिक रेडिओलॉजिकल आणि इमेजिंग असोसिएशन यांच्या विद्यमाने 12 आणि 13 ऑगस्ट रोजी हॉटेल रँडिसन ब्ल्यू येथे भव्य राज्यस्तरीय परिषदेचे (इमॅजिकाँन) आयोजन करण्यात आल्याची माहिती रेडिओलॉजी असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ मंगेश थेटे यांनी दिली. 

या परिषदेत राज्यभरातून व देशभरातून सुमारे 500 क्षकिरण तज्ञ उपस्थित राहणार आहेत,विविध प्रगत सोनोग्राफी तंत्रज्ञान आणि कलर डॉपलर इत्यादींवर अभ्यास. मंगेश थेटे यांनी दिली पूर्ण चर्चासत्रे सदर परिषदेत चर्चिली जातील. या परिषदेत सांध्यांची ( मस्क्युलोस्केलेटल) सोनोग्राफीची प्रत्यक्ष दर्शन कार्यशाळा+ खुले प्रशिक्षण वर्ग देखीलआयोजित करण्यात आले आहे.  गर्भातील शिशूमधील हृदयातील व्यंगदोष निदानित करण्याचे उच्चतम तंत्रज्ञान व प्रशिक्षण या परिषदेत कार्यशाळेत देण्यात येणार आहे. 

या परिषदेस मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील,व्यासंगी अभ्यासू क्ष किरण तज्ञ डॉ. राम मूर्ती ,डॉ.मोहित शहा डॉ.  जोभान बाबुळकर ,डॉक्टर अंकित शहा ,डॉ. प्रदीप ,डॉ. माला सिबल,व डॉ.  वंदना बंसल,डॉ. बिजॉय,डॉ.योगेश जोशी आदी मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन शनिवारी दुपारी सिविल सर्जन डॉ.  अशोक थोरात व डॉ.राममूर्ती  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे व डॉ. मंगेश थेटे करणार आहेत. 

नाशिकमध्ये आयोजित होणारी या श्रेणीतील ही सहावी परिषद असून,हे आयोजन नाशिक रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनचे भूषण आहे. या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षा डॉ. मंजुषा कुलकर्णी, सह आयोजन अध्यक्ष डॉ.  विजय बर्वे व सचिव डॉ. आदिती वानखेडे व सहसचिव डॉ.  अमोल जगदाळे यांनी केले आहे. परिषदेच्या वित्त पुरवठ्याची जबाबदारी डॉ. सचिन खाचणे व डॉ. अक्षय सारडा हे सांभाळत आहेत. 

या परिषदेच्या निमित्ताने,अत्याधुनिक थ्रीडी 4 ङी5 ङी सोनोग्राफी आणि कलर डॉपलर सयंत्रे हे उत्तर महाराष्ट्रातील तज्ञांना बघण्यास व हाताळण्यास उपलब्ध होणार आहे,या संयंत्र प्रदर्शनासाठी डॉ.  किशोर भंडारी ,डॉ.  संजय देसले, डॉ. ललेश नाहाटा परिश्रम घेत आहे. 

या परिषदेत शनिवारी सायंकाळी,सांस्कृतिक सांजसंध्येचेही आयोजन करण्यात आले आहे,त्यात नाशिक मधील प्रतिमा तज्ञ, रॅम्प वॉक व रंगारंग नृत्य बहार आणणार आहेत,व भारताच्या सांस्कृतिक संपन्नतेची झलक उपस्थितांना करून देणार आहेत,सांस्कृतिक आयोजनासाठी डॉ. मंगेश थेटे व डॉ. मृगाक्षी क्षीरसागर प्रयत्नशील आहेत. कार्यशाळेत दाखवण्यात येणाऱ्या,निदानास अवघड असणाऱ्या,आव्हानात्मक केसेस साठी डॉ.  प्रीती आहेर व डॉ.  पल्लवी धर्माधिकारी ,डॉ. मनिषा भुतडा,यांनी बहुमोल कष्ट घेतले आहे. 

नाशिकमध्ये होणारा या भव्य राज्यस्तरीय रेडिओलॉजी परिषदेसाठी,नाशिक मधील जेष्ठ प्रतिमा तज्ञ डॉ. राजेंद्र गवारे ,डॉ.  शैलाजा बल्लाळ , डॉ. मनोज चौधरी ,डॉ.  योगेश महाले व डॉ. स्मिता वाकचौरे,डॉ. अनिता आव्हाड,डॉ. भाग्यश्री पाटील,डॉ. सुशांत भदाने, डॉ. मीरा पाटील ,डॉ.  अभिजीत कपोते ,डॉ. हार्दिक पटेल,डॉ.  कुणाल पाटील,डॉ. मीनल सोनजे ,डॉ.  मनीषा राजळे,डॉ.  राहुल निरगुडे,डॉ.  राहुल सोनवणी आदी मेहनत घेत आहेत. परिषदेची सांगता रविवारी संध्याकाळी होणार आहे, अशी माहितीही डॉ मंगेश थेटे यांनी दिली. 

Leave A Reply

Your email address will not be published.