नाशिक/एनजीएन नेटवर्क
तक्रारदाराकडून 15 लाख रुपये लाचेचा स्वीकार करणाऱ्या नाशिकच्या तहसीलदारांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी नरेशकुमार बहिरम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजुर बहुला (ता. जि. नाशिक) येथील जमिन मालकाच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम १,२५,०६,२२० याप्रमाणे दंड आकारणी केलेबाबत तहसीलदार कार्यालयाकडे आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेरचौकशीसाठी नाशिक तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सदर मिळकती मधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिन मालकाचे कथनात नमूद केले होते. याबाबत पडताळणी करणे कामी जमिन मालकास त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला तालुका येथे स्थळ निरीक्षण वेळी बोलावले होते.
परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याचे दिल्याने ते बहिरम यांना स्थळ निरीक्षण वेळी भेटली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती 15 लाख रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली. यावेळी बहिरम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बहिरम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.